केंद्रप्रमुख गोविंद बाहेती सेवानिवृत्त; सपत्नीक सत्कार करुन दिला सहकार्यांनी निरोप
लोकगर्जना न्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील मोहखेड केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद बाहेती हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. त्यांचा सपत्नीक भरपेहराव देऊन सत्कार करुन सहकार्यांनी निरोप दिला. यावेळी शिक्षणाधिकारी प्रा. श्रीकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक मान्यवरांनी गोविंद बाहेती यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गोविंद झुंबरलाल बाहेती हे आडस येथील रहिवासी असून, त्यांना ३० नोव्हेंबर १९८५ साली सहशिक्षक म्हणून तालुक्यातील रुई धारुर येथे प्रथम नेमणूक मिळाली. येथून अद्यापनाला सुरवात करून अनेक शाळेवर ज्ञान दानाचे कार्य पार पाडले. एक संवेदनशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली. पदोन्नती होऊन ते केंद्रप्रमुख झाले. मोहखेड केंद्रात एक चांगले काम करुन त्यांनी आपल्या कार्याची वेगळीच छाप पाडली. त्याचे उत्तम उदाहरण सेवा पूर्ती समारोहातून दिसून आले. ३७ वर्ष ६ महिने १ दिवस अशी प्रदीर्घ सेवा करुन केंद्रप्रमुख पदावर ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यावेळी शाळा बंद असल्याने मोहखेड केंद्रातील सहकार्यांनी बुधवारी ( दि. २९ ) सेवापूर्ती सोहळा दुपारी पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोविंद बाहेती त्यांच्या अर्धांगिनी भारती बाहेती यांचा भरपेरावा देऊन सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्रीकांत कुलकर्णी ( शिक्षणाधिकारी प्रा. जि.प. बीड ) यांनी गोविंद बाहेती यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आदर्श व्यक्तिमत्व असा उल्लेख करत या ज्ञानाच्या दिव्याने अनेक दिवे प्रज्वलित केली आहेत. त्या ज्ञानाच्या प्रकाशात ते दिवे देशाच्या प्रगतीसाठी आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत. तसेच कार्य तत्परता काय असते याचं उत्तम उदाहरण बाहेती सर असल्याचे सांगून गौरव केला. यावेळी दत्तात्रय मेंढेकर (ज्येष्ठ अधिव्याख्याता डाएट, अंबाजोगाई), कराड हिरालाल ( अधीक्षक,बीड ), गणेश गिरी ( गट शिक्षणाधिकारी, किल्लेधारुर ), शिवाजीर अंडील ( जेष्ठ विस्तार अधिकारी, धारुर), मुळे अनुरथ, राम व्हरकटे, गोविंद सोन्नर, विलास काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रस्ताविक नवनियुक्त केंद्रप्रमुख नागरगोजे यांनी केले तर भारदस्त संचलन पवार राकेश यांनी केले. यावेळी सत्काला उत्तर देताना गोविंद बाहेती यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांचे कंठ दाटून आले तर, डोळे पाणावले होते. यावेळी मोहखेड केंद्रातील अनेक नागरिक शिक्षक तसेच रुई धारुर, आसरडोह, आडस येथील शिक्षक, मित्र, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.