महिला विश्व

‘कुंकवा’ पलिकडची संक्रांत साजरी लोककल्याणचा विधवा,एकल महिलांसाठी उपक्रम

 

लोकगर्जना न्यूज

केज तालुक्यातील आडस येथे लोककल्याण सेवाभावी संस्थेने कुंकवा पलिकडची संक्रांत साजरी करुन विधवा,एकल महिलांना या आनंदात सहभागी करुन घेतले. कपाळावरील कुंकू निघाल्यानंतर प्रथमच संक्रात सणाचा आनंद घेता येत असल्याने अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

संक्रांत हा सण म्हणजे सुवासिनींचा आनंद मेळा या दिवशी सुवासिनी एकमेकिंना कुंकूं लावून ववसतात व तिळगुळ देवून वाण,ववसा स्वरूपात वस्तू देऊन शुभेच्छा देतात. परंतु यामध्ये विधवांना सहभागी होता येत नाही. ही परंपरा चालत आलेली आहे. परंतु या महिलांचा यात दोष काय? माणसांत राहून एकट्याला आयुष्य जगायचे नशिबी आले. काही अघात, अपघात, आजार यामुळे अचानक कपाळावरील कुंकू पुसून गेले. विधवा,एकल महिलांना ही आयुष्य आहे. त्यांनाही सणांचा आनंद घेता यावा या उद्देशाने परंपरेला छेद देत लोककल्याण सेवाभावी संस्था, आडसच्या अध्यक्ष सुषमा आकुसकर यांनी कुंकवा पलिकडची संक्रांत हा उपक्रम राबविला. यामध्ये गावातील विधवा, एकल महिलांना संक्रांत सणात सहभागी करून घेतले. सर्वांना तिळगुळ, व दिनदर्शिका भेट दिली. यानंतर विविध बैठे खेळ घेऊन चहा पाण्याचा सर्वांनी आनंद घेतला. कपाळावरील कुंकू पुसल्या नंतर प्रथमच संक्रात साजरी करण्याचा योग आल्याने अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. हा उपक्रम राबविल्याने अनेकांकडून लोककल्याणचे सुषमा आकुसकर आणि शिवरुद्र आकुसकर यांचे कौतुक करण्यात येत आहे. सविता आकुसकर,सोनल तोडकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

पहिलं पाऊल

आज पहील्यांदा च धाडसाने पाऊल उचलले आणि आडस मधे पहीला “कुंकवा पलीकडची संक्रांत “तीळगुळचा कार्यक्रम माझ्या घरी साजरा केला. ना फोन ना मेसेज प्रत्यक्ष प्रत्येक महीलेची घरी जाऊन भेट घेऊन निमंत्रण दिले . भावनीक जवळीक निर्माण झाली .आणि खुप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जण भरलेल अंतःकरणाने कार्यक्रमात महिला सहभागी झाल्या. समाजातील दुर्लक्षित भाग या उपक्रमातून आमच्या परीवाराशी जोडला गेला.याच खुप खुप आनंद वाटतो. याचे श्रेय कल्पना सुचविणारे माझे पती शिवरुद्र यांना जाते असे सुषमा आकुसकर लोकगर्जनाशी बोलताना म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »