कार्पोरेट क्षेत्रात बीड जिल्ह्याला ओळख निर्माण करुन देणारे सुरेश कुटे यांची आडसला भेट
आडसकरांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी दिली भेट
लोकगर्जना न्यूज
आडस : मागासलेला जिल्हा म्हणून बीड कडे पहाण्यात येतं. परंतु सुरेश कुटे यांनी कुटे ग्रुपच्या माध्यमातून कार्पोरेट क्षेत्रात बीडला ओळख निर्माण करुन दिली. तिरुमला ऑईलच्या माध्यमातून सातासमुद्रापार बीडचे नाव पोहचविणारे यशस्वी उद्योजक सुरेश कुटे यांनी मंगळवारी ( दि. ६ ) आडस ( ता. केज ) येथे भेट देऊन सामान्य नागरिकांसह अनेक व्यापाऱ्यांशी संवाद साधला. तसेच आडसकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.
बीड जिल्हा म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यासमोर ऊसतोड मजूर पुरवणारा मागासलेला जिल्हा उभा रहातो. परंतु या जिल्ह्यात अनेक कोहिनूर हिरे दडलेले आहेत. मग ते राजकीय क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रातही आहेत. उद्योग क्षेत्रात ही कुटे ग्रुपने मुसंडी घेतली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट, तिरुमला ऑईल इंडस्ट्री, गुड मॉर्निंग डेअरी सह विविध दर्जेदार ब्रँड विकसित केले. मागासलेला जिल्हा जागतिक पातळीवर आपलं उत्पादन लोकप्रिय करु शकतो हे तिरुमला खाद्य तेलाच्या माध्यमातून दाखवून दिले. तसेच ऊसतोडी शिवाय काही काम करायचे असेल तर मुंबई, पुणे येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा ठिकाणी उद्योग उभारुन हजारो हातांना काम दिले. कार्पोरेट क्षेत्रात बीडला ओळख निर्माण करून देणारे कोहिनूर सुरेश कुटे यांनी मंगळवारी ( दि. ६ ) आडस येथे भेट दिली. प्रथम येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट आडस शाखेत खातेदार व सामान्य जनतेशी संवाद साधला. यानंतर आडसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी युवानेते ऋषिकेश आडसकर यांनी स्वागत सत्कार केला. तेथून माने फर्निचर, नितिन ठाकुर, चव्हाण कृषी सेवा केंद्र,ओम साई कृषी सेवा केंद्र, माने कृषी सेवा केंद्र, बालाजी ॲग्रो,पतंगे कृषी सेवा केंद्र, ढोले कृषी सेवा केंद्र, कोटे जनरल स्टोअर्स सह आदि ठिकाणी भेटी देऊन संवाद साधला.