क्राईम
कारची काच फोडून सात लाख लंपास; श्वानपथक पाचारण
गेवराई : रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी कारमधील सात लाख रुपये असलेली बॅग चोरून नेली. सदरील घटना गेवराई शहरात दुपारी एक वाजता घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने गेवराई शहरात खळबळ माजली आहे.
शहरातील सेवालाल नगर येथे काय क्रं. एम.एच. २३ बी.सी. ९९७७ उभी होती. त्यामध्ये एका बॅगेत सात लाख रोकड होती. या वर नजर ठेवून असलेल्या आज्ञात चोरट्यांनी संधी साधून कारच्या काचा फोडून रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली.हा प्रकार लक्षात येताच कार मालकाने पोलीसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गेवराई पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कार कापसाच्या व्यापाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे.