कृषी

कापूस दर वाढण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे दरवाढीचा केंद्र सरकार कडून बक्षीस

लोकगर्जनान्यूज

बीड : शेतकरी घरात असलेल्या कापसाची दरवाढीची वाट पाहत असताना केंद्र सरकारने कापूस बियाणे बॅगचे दर वाढवून एका प्रकारे शेतकऱ्याला बक्षीस दिल्याची उपरोधिक टीका शेतकरी करत आहेत. बीजी 2 ( BG 2 ) एका बॅग मागे तब्बल ४३ रु. वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस लागवडीचा खर्च वाढणार आहे. तसेच खतांचे दर भरमसाठ वाढलेली असताना शासन एकीकडे सन्मान निधी देऊन दुसरीकडे अशी काढून घेत आहे का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

मराठवाडा व विदर्भ मध्ये पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापूस हा नगदी पीक समजला जातो. याभागात सोयाबीन व कापूस हे म्हत्वाची दोन पिकं आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून बियाणे दोष की, इतर काही कारणांमुळे कापूस पिकावर विविध अजारांचा मारा होत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीनकडे वळला आहे. पण गतवर्षी कापसाला शेवट पर्यंत प्रतिक्विंटल १३ हजार असा विक्रमी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्याने या खरीप हंगामात कापूस लागवडीला प्राधान्य दिले. कापसाचा टक्का वाढला. परंतु दर पडलेले आहेत. यावर्षी कापूस खरेदी १४ हजार पासून सुरू झाली. यानंतर नऊ हजारांवर दर स्थिर झाले पण त्यातही घसरण होऊन आज दर ७६०० वर आले आहेत. यामुळे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची थप्पी घरात लावलेली आहे. तो कापसाचे दर वाढण्याची वाट पाहत आहे. पण कापसाचे नाही तर कापूस बियाणेचे भाव वाढल्याची बातमी आली आहे. केंद्र शासनाने गुरुवारी ( दि. २३ ) राजपत्र जाहीर करुन बीजी १ व बीजी २ कापूस बॅगचे दर वाढल्याचे घोषित केले. बीजी १ हे वाण आता जवळपास कालबाह्य झाले असल्याने शेतकरी बीजी २ बीटी लागवड करतो. या ४७५ ग्रॅमच्या बॅगची किंमत अगोदर ८१० रु. इतकी होती. आता यात ४३ रु. वाढ होऊन ही बॅग शेतकऱ्याला आता ८५३ रुपयांना मिळणार आहे. आधीच खतांचे दुप्पट दरवाढ यानंतर कापूस बियाणे दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तर शेतकरी त्यांच्या मालाचे दर वाढीची वाट पाहत असताना शासन मात्र कंपन्यांचे घर भरण्याचे काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करत दरवाढीचा निषेध केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »