कापूस दरात सुधारणा होतेय पण सोयाबीन हमी भावाच्या खालीच
लोकगर्जनान्यूज
बीड : सध्या कापूस दरात काहीसी सुधारणा दिसून येत असून आणखी दर वाढतील असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. दुसरीकडे प्रमुख पीक असलेले सोयाबीन मागील काही दिवसांपासून हमी भावापेक्षा खालीच असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन दरवाढीची अशा आहे.
कापूस हे एकेकाळी प्रमुख पीक होते परंतु त्यावरील विविध प्रकारच्या रोगांमुळे उत्पादनात मोठी घसरण झाली. यामुळे शेतकरी कापूस पिकाला पर्याय शोधत असताना अचानक सोयाबीन दराने उसळली गेतली अन् दर १२ हजार प्रतिक्विंटल पर्यंत पोचले. वाढते दर पाहून शेतकरी सोयाबीन कडे वळला. आज सोयाबीन हे प्रमुख पीक ठरले असून कापसाला मागे टाकले आहे. परंतु सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांचे दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांकडे तर मागील तीन वर्षांपासून दरवाढ होईल म्हणून सोयाबीन घरात पडून आहे. कापूस ही यंदा ६४०० ते ६९०० पर्यंत खाली आलं. परंतु मागील आठवडा भरा पासून कापसाच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. ६९०० चांगल्या प्रतिचा प्रतिक्विंटल विकणारे कापूस आठ दिवसांत ७२५० पर्यंत पोचले आहे. मागील आठवडा भरात कापसाच्या दरात ३५० रु. सुधारणा दिसत आहे. आणखी दर वाढतील असा अंदाज वर्तविण्यात येत असून दर वाढीच्या दराचा फायदा घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी टप्याटप्याने कापूस विक्री करावी असे आवाहन शेती पीक बाजारभाव अभ्यासक करत आहेत. कापसाचे वाढते दर पहाता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. सोयाबीनचे यावर्षी उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात असले तरी दर मात्र दबावाखाली आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन साठी प्रतिक्विंटल ६ हजारांच्या दराची अपेक्षा असून यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून सोयाबीन न विकता घरात ठेवलेला आहे. यावर्षीतर दर खूपच खाली आले असून जवळपास मागील तीन आठवड्यापासून सोयाबीन दर हमी भावाच्या खालीच आहे. याचे काही दर वाढीचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या दर घसरण्याला शासनाचे काही निर्णय कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.