क्राईम

कानातील सोन्याच्या काड्यांसाठी चिमुकल्याचा खून वडीलांच्या खात्यातील खर्च केलेल्या पैशांच्या भरपाईसाठी अल्पवयीन मुलाचे कृत्य

 

तुळजापूर : तालुक्यातील सांगवी ( मार्डी ) येथे अंगाचा थरकाप उडवून देणारी घटना समोर आली. बापाच्या खात्यातील गुपचूप खर्च केलेल्या पैशांच्या भरपाईसाठी करण्यासाठी १७ वर्षांच्या मुलाने पाच वर्षाच्या मुलाचा खून करुन त्याच्या कानातील सोन्याच्या काड्या काढून घेतल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगवी ( ता. तुळजापूर ) येथील रहिवासी वाहनचालक मनोज बागल यांना एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्ये आहेत. त्यांनी मुलगा ओम बागल ( वय ५ वर्ष ) यास दहा रुपये देऊन डोकं दुःखी वर उपाय करणारी गोळी आणण्यासाठी दुकानावर पाठवले. त्यांने दुकानावर जाऊन गोळीही मागीतली परंतु लहान मुलगा असल्याने त्यास दुकानदाराने गोळी दिली नाही. बराच वेळ झाला असता ओम कसा आला नाही म्हणून मनोज बागल दुकानाकडे गेले. दुकानदाराला चौकशी केली असता त्यांनी तो घराकडे परत गेला असल्याचे सांगितले. परंतु घरी न परतल्याने शेजारी, नातेवाईक यांच्या घरी शोधले परंतु मिळून आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बंद घरातील स्वच्छतागृहात चिमुकला मृतावस्थेत आढळला. त्याच्या कानातील सोन्याच्या काड्या गायब होत्या तसेच कानाला जखम होती. घटनेची माहिती पोलीसांना देताच पोलीस अधीक्षक निवा जैन, उपाधीक्षक सई भोर पाटील, पोलीस निरीक्षक आदिनाथ जैन यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसे तज्ञांना पाचारण केले. सर्व बारकाईने अभ्यास करुन एका संशयित १७ वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तो उस्मानाबाद येथील इंग्रजी शाळेत शिकत आहे. त्याने वडीलांच्या खात्यातील रक्कम गुपचूप खर्च केली. जर पैसे कुठे गेले विचारले तर काय सांगावं म्हणून त्याने या पाच वर्षाच्या चिमुकल्याला घरा नेऊन गळा दाबून ठार केले. कानातील सोन्याच्या काड्या काढून घेऊन मृतदेह बंद घरातील स्वच्छतागृहात फेकल्याचे उघड झाले. या घटनेने सांगवी गावात खळबळ माजली असून, एका चिमुकल्याचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »