राजकारण

काँग्रेसचा बीड येथील ओबीसी मेळावा ऐतिहासिक ठरणार-सुरेश यादव

धारूर : देशामध्ये ओबीसी ची जनगणना जातनिहाय करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागामार्फत बीड येथे विभागीय मंथन शिबिराचे आयोजन केले आहे. ओबीसी काँग्रेसच्या वतीने भारत सरकार व राज्य सरकार कडे विविध ठरावाद्वारे ओबीसीच्या जातीनिहाय जनगणना व आरक्षणासंदर्भात सतत लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केलेला आहे.

महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटेल व ओबीसी काँग्रेस विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली मंथन शिबिर, धरणे आंदोलन, हल्लाबोल मेळावे, 12 बलुतेदार ,भटके विमुक्त, मुस्लिम ,कष्टकरी , शेतकरी प्रवर्गातील ओबीसी बांधवाचे शिबिरे कार्यक्रम घेऊन प्रश्न शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न केला आसुन,तरी ही केंद्र सरकारकडून नेहमी ओबीसी च्या प्रश्नावर अन्याय केला जातो असा आरोप काँग्रेसचे विज्ञान, तञंज्ञान व कौशल्य विकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव यांनी केला आहे.कारण भाजपाला ओबीसीचे आरक्षण रद्द करायचे आहे हा त्यांच्या सरकारचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन ओबीसीचे आरक्षणासंदर्भात टिकवणे काळाची गरज आहे . त्यासाठी बीड येथे 8 ऑक्टोबर 2022 शनिवार रोजी विभागीय ओबीसी काँग्रेसच्या वतीने जनजागरणसाठी मंथन शिबिराद्वारे आयोजन केले आहे. बीड येथील ओबीसी काँग्रेसचा विभागीय मेळावा ऐतिहासिक ठरणार असे सर्व ओबीसी बांधवांना खात्री आहे. देशातील व राज्यातील सतत ओबीसी बांधवांवर भजपा सरकारकडून मानहानी केली जात असून सर्व स्तरात आरक्षण पासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, त्याकरिता ओबीसी बांधवांना व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन मंथन शिबिराद्वारे विविध विषयावर चर्चा करून निर्णय हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आक्रमक नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले जम्मू कश्मीर प्रभारी खा. रजनीताई पाटील ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार माजी मंत्री अशोकराव पाटील आ. धीरज देशमुख ओबीस काँग्रेसचे समन्वयक राजेंद्र राख, राजेसाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी कमिटी,वसंत मुंडे व सर्व आजी-माजी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी महाराष्ट्राचे ओबीसी चे सर्व कार्यकारणी सदस्य मराठवाड्यातील मान्यवराची उपस्थिती लाभणार आहे. तरी ओबीसी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे कळकळीचे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विज्ञान तञंज्ञान व कौशल्य विकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव ,बाबा चव्हान, सुबराव सोळंके, राधाकृष्ण गवळी, सिद्धेश्वर रंधवे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांनी बीड येथील ओबीसी काँग्रेसच्या मंथन शिबिरास हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »