प्रादेशिक
ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण गुजरातमध्ये
झिम्बाब्वे येथून आलेल्या ७२ वर्षीय वृध्द
करोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण देशात कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये आढळला आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे.
गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्यांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची माहिती दिली.