एक छोटेखानी कार्यक्रमात अचानक सर्वांचेच फोन वाजू लागले
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील एका गावात आज सकाळी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक अजब प्रकाराने सर्वच अचंबित झाले. तो प्रकार असा होता की, उपस्थित सर्वांचेच अचानक मोबाईल वाजू लागले. हा नेमका प्रकार काय? म्हणून चेहऱ्यावर काही भीतीदायक शंकेने हा मेसेज काय? म्हणून विचारु लागले. तर काहींनी मोबाईल बंद करुन ठेवले. पण काही वेळाने यामागील कारण समजल्यानंतर सुटकेचा निःश्वास टाकला.
आज गुरुवारी ( दि. २० ) सकाळी १:३० वाजण्याच्या सुमारास अनेकांच्या मोबाईलवर यमरजन्सी अलर्ट सेव्हर ( emergency alert severe ) असा धोक्याचा मेसेज आला. यामध्ये ‘हा भारत दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे.’ असे म्हटले गेले आहे. हा स्क्रीन मेसेज आहे. परंतु यामुळे आडस ( ता. केज ) येथे काहीसी धांदल उडाल्याची दिसून आली. त्याचे झाले असे की, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आडस शाखेत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या ५०ते६० जनांचे मोबाईल एकाच वेळी अचानक वाजू लागले. प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे पहात मोबाईल पाहू लागले. सर्वांना अलर्ट असा मेसेज आलेला होता. हा काय प्रकार? म्हणून सर्व चिंतेत होते. परंतु काही वेळात यामागील कारण समजल्यानंतर सुटकेचा निःश्वास टाकला.
घाबरून जाऊ नका
काही आपत्ती आल्यानंतर लोकांना एकाच वेळी जागृत करता यावे व त्यांना पूर, भूकंप अथवा काही आपत्ती आली तर त्याची माहिती देता यावी असे शासनाचे प्रयत्न असून त्याची चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे असा मेसेज अथवा कॉल आला तरी घाबरून जाऊ नका असेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.