एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपी पकडले
माजलगाव : एएसपी पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार पथकाने माजलगाव येथे मोठी कारवाई केली. यामध्ये त्यांनी गुटख्यासह आदि ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी सिने स्टाईल पाठलाग करुन त्यांना पकडले. ही कारवाई आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास केली.
एएसपी पंकज कुमावत यांना माजलगाव येथे दोन तरुण महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा घेऊन येत असल्याची पक्की खबर मिळाली होती. यावरून कुमावत यांनी त्यांच्या पथकास याबाबत कारवाईच्या सूचना करून पाठवले. पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आझाद चौकातील बायपास रोडवर सापळा रचला. दरम्यान एक स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. २० सि . एच ३१९९ आली रस्त्याच्या कडेला उभी रहाताच, स्विफ्ट कार क्र . एम.एच. १४ एफ सी. २९२३ आली व त्या स्कॉर्पिओ जवळ थांबली .स्कार्पिओ मधून गुटखा स्वीफ्ट मध्ये पास करताना पोलीसांनी झडप घातली. तिघांना जागेवर पकडले तर, दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी सिने स्टाइल पाठलाग करुन त्यांना पकडले. यावेळी राज निवास कंपनीचा ३२ बॅग सुगंधित मसाला गुटखा किंमत १ लाख ६० हजार , जाफरानी जर्दा पुडे ४० हजार , स्कार्पियो जूनी किंमत ३ लाख , स्विफ्ट कार जूनी कींमत ३ लाख रुपये , मोबाईल असा एकूण ९ लाख २२ हजारचा मुद्देमाल ताब्यात घेतला . याप्रकरणी पो.हे. कॉ. बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी त्रिंबक आनंत डुकरे , ज्ञानेश्वर बाबासाहेब होंडे , सचिन गोरख सुरवसे , बाबासाहेब सुभाष वरेकर , अशोक धोंडीराम वरपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई पो. ना. बांगर , भंडाने , वंजारे , अहंकारे यांनी केली.