
केज : ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरची ट्रॉली पार्टी होऊन दुसऱ्या ट्रॅक्टरच्या हेडवर कोसळली तो ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन पडला. यावेळी रस्त्यावरील ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली. असा तीन वाहनांच्या विचित्र अपघाताची घटना केज-कळंब रस्त्यावर घडली. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
रविवारी ( दि. ३ ) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शंभु महादेव कारखान्याला दोन ट्रॅक्टर ऊस घेऊन जाताना एकमेकांना ओव्हरटेक करताना ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ४४ डी २०१७ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीने चालविला त्यामुळे ट्रॉली पलटी होऊन त्यातील ऊस एम.एच. ४४ एस ८३५३ यावर पडले. एक ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन पडला. याच वेळी एक दुचाकीस्वार रस्त्यावरील ट्रॅक्टरवर जाऊन धडकला. असा तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. यातील समाधानाची बाब म्हणजे जिवीतहानी टळली परंतु शेतऱ्याच्या ऊसाचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.