ऊसतोड कामगारांसाठी जिल्हाधिकारी collector दिपा मुधोळ-मुंडे यांचे म्हत्वाचे आवाहन
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात व राज्यातील काही भागात ऊसतोड मजुरांची मोठी संख्या आहे. यांच्या विकासासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु अद्याप ऊसतोड मजुरांची नोंदणीच पुर्ण झाली नाही. या अनुषंगाने बीडच्या जिल्हाधिकारी ( collector ) दिपा मुधोळ-मुंडे यांनी म्हत्वाचे आवाहन केले.
शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि. 21 सप्टेंबर 2021 अन्वये राज्यातील ऊसतोड कामागार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे व जे सतत मागील तीन वर्षापासुन ऊसतोडणी करीत आहेत अशा ऊसतोड कामगारांची ग्रामसेवकाने (संबंधीत गावातील, वस्त्यांमधील, पाडयांमधील व इतर ) सर्वेक्षण करुन नोंदणी करावी असे निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने बीड जिल्हा जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन वेबसाईट (https://zpedms.com) तयार केलेली असुन याव्दारे 37634 ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
दिनांक 06 जुलै 2023 रोजीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी ( collector ), बीड यांनी सर्व ऊसतोड कामगार यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचे लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी असणे आवश्यक आहे. तरी सर्व ऊसतोड कामगार यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी ( collector ) दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.