उसासाठी केज तालुक्यातील साखर कारखान्याच्या मा. संचालक पतीचा फडातच आत्मदहनाचा इशारा
लोकगर्जना न्यूज
बीड जिल्ह्यात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून अजूनही शेतात लाखो मेट्रिक टन उभा आहे. ऊस उत्पादक शेतकरी अनेक कारखान्याचे उंबरे झिजवत आहे परंतु कोणीही ऊस घेऊन जाण्यासाठी तयार नाही. केज तालुक्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या मा. संचालक पती असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ऊसाचा फड पेटवून त्यामध्ये आत्मदहनाचा इशारा साखर संचालकांना निवेदनाद्वारे दिला. ही बाब समोर येताच केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीच्या बातमी नुसार शत्रुघ्न तपसे रा. चंदनसावरगाव ( ता. केज ) असं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्याच नाव आहे. तपसे व त्यांची पत्नी दोघेही अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. तर ऊस उत्पादक शेतकरी तपसे यांच्या पत्नी या केज येथील विखेपाटील सहकारी साखर कारखान्याच्या मा. संचालक आहेत. तरीही त्यांना ऊस कारखान्याला घालण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. ऊस न गेल्याने शत्रुघ्न तपसे यांना त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी पैसे नसल्यामुळे चार महिन्यांत अनेक वेळा तारीक पुढे ढकलण्याची वेळ आली. लहान मुलीचे शिक्षण थांबले आहे. परंतु ऊस काही जात नसल्याने १० दिवसांपूर्वी साखर संचालकांना निवेदन देऊन ऊस घेऊन जाण्याची विनंती केली. १० दिवसांची वेळ दिलेली असून आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. तीन दिवसांत ऊस कारखान्यांनी घेऊन गेले तर ठिक अन्यथा ऊसाच्या फडाला काडी लावून त्यातच उडी घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना व येडेश्वरी सहकारी साखर प्रशासन जबाबदार असेल असेही संबंधित शेतकरी वाहिनीशी बोलताना दिसत आहे.