उपअभियंता व खाजगी ईसम एसीबीच्या जाळ्यात: परळीत खळबळ
लोकगर्जनान्यूज
परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतूक करण्यासाठी गेट पास देण्यासाठी ८० हजारांच्या लाचेची मागणी करुन ती खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारणारा उप कार्यकारी अभियंता व संबंधित खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे परळी शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतूकीसाठी वाहनांना प्रवेश मिळावा म्हणून २० गेट पास देण्यासाठी उप कार्यकारी अभियंता याने तक्रारदाराकडे प्रति पास ४ हजार प्रमाणे ८० हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित व्यक्तीने याबाबत बीड एसीबी कडे तक्रार केली. त्यानुसार बीड एसीबीने सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमाला पकडले. अनिल रामदास वाघ ( वय ३६ वर्ष ) औष्णिक विद्युत केंद्र,परळी उप कार्यकारी अभियंता, आदिनाथ आश्रुबा खाडे खाजगी इसम असे लाचखोरांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वीच बीड येथे वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात अडकला त्यानंतर लागलीच ही कारवाई झाल्याने लाचखोरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.