कृषी
उद्योजक बालासाहेब इंगोले यांना मातृ शोक

आडस : मैनाबाई लक्ष्मण इंगोले ( वय ७५ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने सोमवार ( दि. २८ ) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या उद्योजक बालासाहेब इंगोले, गणेश इंगोले यांच्या मातोश्री होत.
दम्याच्या त्रास वाढल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान येथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. धार्मिक व सर्वात मिळून मिसळून रहाणाऱ्या म्हणून मैनाबाई इंगोले या परिचीत होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले, सुना, चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मैनाबाई इंगोले यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता होळ रस्त्यावरील स्वतः च्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.