उद्योजकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
लोकगर्जना न्यूज
गेवराई तालुक्यातील एका उद्योजकाचे अपहरण करून खंडणी मागितली, खंडणी देण्यास नकार दिल्याने उद्योजकास बेदम मारहाण करण्यात आली. वडीगोद्री जवळ चालत्या वाहनातून फेकून दिल्याची घटना घडली होती. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती तर, मादळमोही येथे घटनेचा निषेध करत अपहरणकर्त्यांना अटक करावी म्हणून बंद पाळण्यात आला. याची दखल घेऊन बीडचे पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांनी छडा लावून अपहरण करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले. या कामगिरीबद्दल बीड पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
दिनांक 27 जानेवारीला फिर्यादी कैलास आसाराम शिंगटे ( वय 33 वर्षे ) रा.मादळमोळी ता. गेवराई यांनी पोलीस स्टेशन चकलांबा येथे फिर्याद दिली की, मला दिनांक 26/01/2022 रोजी दुपारी 04.00 वा सुमारास फोन आला की, शेततळे बनवयाचे आहे तुम्ही साठेवाडी येथे या, असे म्हणून मला बोलावुन घेतलं. माझ्या मोटर सायकलला साठेवाडी लोखंडे वस्ती जवळ पाठीमागून स्कॉर्पिओने धक्का मारुन खाली पाडले, डोळयात चटणी टाकुण दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने दांडयाने हातपायावर मारुन तु जर पोलीसांना सांगितले तर , जिवे मारुन टाकु अशी धमकी देवून पाच जणांनी रोडच्या कडेला टाकुण निघुन गेले . अशी फिर्याद दिली. त्यावरून पोलीस स्टेशन चकलांबा गुरंन 24/2022 कलम 364 ( अ ) 365 भादवी प्रमाणे दाखल आहे . ही घटना गंभीरतेने घेवून पोलीस अधीक्षक यांनी आरोपीना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांना गुप्त खबऱ्या व तांत्रीक विश्लेषणाद्वारे बातमी मिळाली की , सदरील गुन्हा 1) संतोष हनुमान धनगर रा . गोपाळवस्ती बेलगाव ता . गेवराई, 2) ज्ञानेश्वर श्रावण माळी रा . गोपाळवस्ती बेलगाव ता गेवराई, 3) रामा भगवान गव्हाणे रा . गोपाळवस्ती बेलगाव ता . गेवराई, 4) संजय रामदास पवार रा . सावरगाव ता.गेवराई, 5) विशाल बाबासाहेब जाधव रा.म्हालसपिंपळगाव सांगवी ता . नेवासा जि . अहमदनगर यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधीकारी, अमंलदार यांनी यातील संतोष हनुमान धनगर रा . गोपालवस्ती बेलगाव ता . गेवराई , ज्ञानेश्वर श्रावण माळी रा . गोपाळवस्ती बेलगाव ता गेवराई, विशाल बाबासाहेब जाधव रा.म्हालसपिंपळगाव सांगवी ता . नेवासा जि . अहमदनगर यांना म्हाळसपिंपळगाव ता. नेवासा येथून तसेच रामा भगवान गव्हाणे यास गोपाळवस्ती बेलगाव येथून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आम्ही व संजय रामदास पवार रा . सावरगाव ता . गेवराई यांचे सोबत केल्याचे कबुली दिली. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधीकारी व अमलदारांनी केली.