उकळते तेल अंगावर टाकून सासूची हत्या करणाऱ्या सुनेला जन्मठेप
अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : दादाहरी वडगाव परळी तालुक्यात २०१७ मध्ये सुनेने सासुच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केले. जखमी सासुचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील क्रुरकर्मा सुनेला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अंबाजोगाई सत्र न्यायाधीश विक्रमादित्य यांनी सुनावली आहे.
चंद्रकलाबाई शिंदे असे मयत सासुचे नाव आहे. चंद्रकलाबाई यांच्या मुलगा विष्णू सोबत ज्योती याचा विवाह झाला. परंतु लग्नाच्या काही दिवसातच सुन ज्योती विष्णू शिंदे ही तुसड्या सारखे वागू लागली. पती विष्णू यालाही जेवण देत नसे, सासुला नेहमी टोचून बोलणे असे प्रकार सुरू झाले. नंतर ती प्रसुतीसाठी माहेरी गेली आता चांगलं राहील असे सर्वांना वाटत होते परंतु परत आल्यावर चंद्रकलाबाईंना ती मुलाला घेऊ देत नसे आणि माझ्या मुलाला घ्यायचं नाही असे म्हणत असे. ३ सप्टेंबर २०१७ सकाळी सासु चंद्रकलाबाई या जेवण करत असताना ज्योती हातात एक पातेल घेऊन आली अन् सासुबाईंना दूध देऊ का? म्हणून विचारलं असता त्यांनी नको मुलाला राहुदे असे म्हटले. यावेळी सूनेने कसलाही विचार न करता हातातील गरम तेलाच पातेल सासुच्या डोक्यावर ओतलं यामुळे त्या भाजल्या. जिवाची घालमेल होत असल्याने त्या घरा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु सुनेने दार लावून घरात कोंडून ठेवले. परंतु आरडाओरडा ऐकून शेजारी आले आणि त्यांनी चंद्रकलाबाईंना दवाखान्यात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत्यूपुर्वी जबाबा वरुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुन ज्योती शिंदे विरोधा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात आरोपीला न्यायलयाने दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंड शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. शिवाजी मुंडे यांनी काम पाहिले.