![इनोव्हा-दुचाकीची धडक;१ठार १ गंभीर इनोव्हा-दुचाकीची धडक;१ठार १ गंभीर](https://i0.wp.com/lokgarjananews.in/wp-content/uploads/2023/01/56464-scaled.jpg?resize=780%2C470&ssl=1)
लोकगर्जनान्यूज
बीड : इनोव्हा आणि दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बीड-मांरसुबा रस्त्यावर पाली जवळ घडली आहे.
बीड-मांजरसुंबा रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून या रस्त्यावर नेहमीच अपघात होऊन यामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. आजही बुधवारी (दि.१८) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार क्र. एम.एच. २३ ई ७८७८ याची व दुचाकी क्र. एम.एच.२३ बी ई ७७१२ यांची समोरासमोर धडक झाली. यामुळे घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शेख सरवर चांद (वय ५५वर्ष) रा. बालेपीर, बीड हे ठार झाले तर शेख नदीम बशीर (वय ४२वर्ष ) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत करत दवाखान्यात दाखल केले. परंतु तोपर्यंत शेख सरवर यांची प्राणज्योत मालवली होती. जखमीवर बीड येथे उपचार सुरू आहे.