भवताली
इनामदार जमिरोद्दीन यांचे निधन: दफनविधी आज रात्री
लोकगर्जना न्यूज
आडस : येथील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त शिपाई शेख जमारोद्दीन फयाजोद्दीन ( इनामदार ) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.
जमिरोद्दीन इनामदार ( वय ९५ वर्ष ) हे येथील शाळेचे जुने शिपाई होते. एक शांत संयमी व मनमिळाऊ स्वभाव असल्याने सर्वांना आपलेसे वाटायचे. आज बुधवारी ( दि. २१ ) जमिरोद्दीन इनामदार यांचे दुपारी आडस येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची नमाज ए जनाजा ईशा ( बाद ) नंतर मर्कज मस्जिद येथे होईल आणि दफनविधी मर्कज मस्जिद जवळील कब्रस्तानात होईल.