बीड : सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू असतानाच बीड विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांचे अनेक कार्यकर्ते आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल होत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे बळ प्राप्त होताना दिसत आहे.मंगळवार (दि.२२) रोजी बीड तालुक्यातील चौसाळा व कानडी घाट येथील विविध पक्षांच्या ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामपंचायत सदस्य संजित माने,पंजाब बारगुळे,दादाराव कळासे, शैलेश सोनावणे,पोपट कळसकर यांच्यासह येथील जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब झोडगे,निवांत झोडगे, शिवाजी झोडगे, सुभाष झोडगे, योगीराज झोडगे, मयूर झोडगे, सतीश कुडके, अक्रूर गवळी आदी शिवसेनेच्या मुळ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच कानडी घाट येथील चौसाळा गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या प्रयागबाई सखाराम काकडे, गणेश काकडे यांच्या गावातील कार्यकर्त्यांनीही मंगळवार (दि.२२) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह डॉ.बाबु जोगदंड, सयाजी शिंदे, विजय नवसेकर, नाना जोगदंड, श्रीमंत सोनवणे, शिकूर सौदागर आदींची उपस्थिती होती. प्रवेशाबद्द्ल आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधितांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.