आ. नमिता मुंदडा यांना लीड किती मतदारांना उत्सुकता
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा यांच्या विजयाची लोकांना इतकी खात्री आहे की, चक्क त्यांना लीड किती मिळणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. यामुळे मतदारांनाच मुंदडांच्या विजयाची उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे.
केज विधानसभा मतदारसंघ आणि मुंदडा कुटुंबाचे परिवाराचे नाते आहे. मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीसाठी मुंदडांच्या घराचे चोवीस तास दार उघडे असते, तर मतदारसंघातील कोणतेही निमित्त असु दे, त्यात हे कुटुंब सहभागी असते. जसजसा काळ पुढे सरकत आहे तसे हा नातं अधिक घट्ट होत चालले आहे. पाच वर्ष हे कुटुंब मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असते त्यामुळे निवडणुकीच्या काळात सामान्य मतदार हे १५ दिवस मुंदडा परिवाराच्या पाठीशी उभा असतो. यामुळे येथे त्यांना जय पराजयाची भीती नसते. इतर मतदारसंघात कोण विजयी होणार, कोण पराजित होणार? अशी चर्चा असते. पण केज मतदारसंघात एक अपवाद वगळता तब्बल सात निवडणुकांमध्ये मुंदडा कुटुंब विजयी झाले आहे. आत आठव्या वेळी त्यांचा विजय स्पष्ट दिसत असून, मतदारच आता आ. नमिता मुंदडा यांना किती लीड मिळणार याबाबत चर्चा करीत असताना दिसत आहेत.