आसाराम लोमटे यांच्या हस्ते आसारडोहकर पुरस्काराचे वितरण
शुभम खाडे ठरले दहाव्या पुरस्काराचे मानकरी

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : कै. त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ युवा पत्रकार शुभम खाडे यांना यापुर्वीच घोषित करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रा. आसाराम लोमटे (परभणी) यांच्या हस्ते तर जेष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ फेब्रुवारी रोजी प्रदान केला जाणार आहे.
दैनिक कार्यारंभचे उपसंपादक युवा पत्रकार शुभम खाडे यांना यंदाचा हा मानाचा दहावा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण २२ फेब्रुवारी रोजी जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रा. आसाराम लोमटे आणि अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम अंबाजोगाई येथे पत्रकार भवन येथे पार पडणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, फेटा शाल, स्मृती चिन्ह असे आहे. आसरडोहकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
या पुरस्काराचे आजपर्यंतचे मानकरी
आसरडोहकर प्रतिष्ठानचा हा दहावा पुरस्कार आहे. यापूर्वी सय्यद दाऊद (आडस), श्रावण कुमार जाधव (केज), दत्ता देशमुख (विडा), अभिजित गाठाळ (अंबाजोगाई), गोविंद शेळके (घाटनांदूर) कलीम अजीम (पुणे), अतुल कुलकर्णी (बीड) संदिप सोनवलकर (मुंबई), आणि विद्या गावंडे (औरंगाबाद) यांना मिळालेला आहे.