आश्चर्य! कोकण प्रमाणे बीड जिल्ह्यात फणस .. धारुर तालुक्यात लगडली फळे

फणस म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर समोर कोकण उभं रहात कारण हा फळ दमट हवामानात येणार आहे. परंतु बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही. स्ट्रॉबेरी पाठोपाठ आता बीड जिल्ह्यात फणस ही येत आहे. धारुर तालुक्यातील पांगरी येथे सेवानिवृत्त फौजदार अहंकारे यांच्या शेतातील फणसाच्या झाडाला फळ लगडली आहेत. हे चित्र पहाता अनेकांना आश्चर्य वाटतं आहे.
केज येथे सेवा बजावून नंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा निवृत्त झालेले देविदास अहंकारे यांची धारुर-आडस रस्त्यावरील धारुर तालुक्यातील पांगरी येथे शेती आहे. आवड म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी शेतात फणसाचे झाड लावले आहे. यासाठी मराठवाडा व बीड जिल्ह्यात पोषक वातावरण ही नाही. फणस म्हणजे समुद्र किनारी, दमट हवामानात येणार फळ आहे. उष्ण वातावरणात शक्यतो फणस येत नाही परंतु आश्चर्य कारक बाब ठरली असून, देविदास अहंकारे यांच्या शेतातील फणसाला फळे आली आहेत. फणसांनी झाड लगडून गेले आहे. हे चित्र बीड व मराठवाड्यासाठी दुर्मिळ असे समजण्यात येत आहे. ज्यांनी फणसचं पाहिलं नाही ते फणस पहाण्यासाठी जात आहेत. परळी तालुक्यातील परचुंडी येथील स्ट्रॉबेरी नंतर आता धारुर तालुक्यातील पांगरी येथील फणस चर्चेत आले आहे.