लोकगर्जनान्युज
माजलगाव : विधानसभा मतदारसंघाचे आमदार सोळंके यांचे विश्वासू पीएला भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदरील घटना शुक्रवारी सायंकाळी घडल्याचे सांगण्यात येत असून मारहाण करणारा भाजपा तालुकाध्यक्षाचा पुतण्या असल्याचे वृत्त असल्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचे चित्र माजलगावात दिसत आहे.
शुक्रवारी सायंकाळी पीए महादु सोळंके हे रंगोली कॉर्नर येथे थांबले होते. यावेळी एका तरुणाने येऊन आमदारांच्या घर जाळपोळ प्रकरणी आमची नावे का घेतली? असे विचारत मारहाण केली. हा मारहाण करणारा तरुण भाजपा तालुकाध्यक्षाचा पुतण्या असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अद्याप पर्यंत पोलीसात गुन्हा दाखल झाला नाही. परंतु या घटनेची कोणीतरी मोबाईलवर शुटिंग करुन ती सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.