आमदार बच्चू कडु यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा

लोकगर्जनान्यूज
अपंगांसाठी असलेला निधी खर्च न केल्याने या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्तांवर हात उचलल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने बच्चू कडु यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
बच्चु कडू म्हणजे चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व असून ते राज्यात विविध आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. सन २०१७ मध्ये नाशिक महानगरपालिका विरोधात प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अपंगांसाठी असलेला ३ टक्के निधी खर्च न केल्याने करण्यात आले. यावेळी आमदार बच्चू कडु आणि तत्कालीन आयुक्त यांच्यात खडाजंगी झाली. अन् आमदार बच्चू कडु यांनी आयुक्तांवर हात उचलला होता. यासंबंधी महानगर पालिका प्रशासनाने तक्रार केली. त्यावरून आ.बच्चु कडु यांच्या विरुद्ध सरकार वाडा नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरण नाशिक सत्र न्यायालयात सुरू होते. याचा निकाल देत न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने अटी-शर्तिंसह जामीन मंजूर केला. याप्रकरणी आ. बच्चू कडु मुंबई उच्च न्यायालयात दादा मागणार आहेत. असे वृत्त मटाने दिले आहे.