आपला जिल्हा

आमदारांच्या पगारीचे पत्र व्हायरल! पगार अन् भत्ते पाहून डोळे फिरतील

लोकगर्जनान्यूज

सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत असून माहिती अधिकारातून हे माहिती मागितली आहे. त्यावर १ आमदाराला मुळ पगार अन् विविध भत्ते सह एकूण पगारचा आकडा आहे. तो आकडा पाहून प्रत्येकाचे डोळे फिरतील आकडेवारी पहाण्यासाठी पुर्ण बातमी वाचावी लागेल.

सध्या राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, सर्व कार्यालय ओस पडली आहेत. सामान्य जनतेची कामे खोळंबली असून, विशेष म्हणजे रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. कालच घाटी रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याचे वृत्त आहे. यामध्ये सामान्य लोकांकडून पेन्शन प्रश्नी कर्मचाऱ्यांवर टीका केली जात आहे. इतका पगार असताना यांना पेन्शन का? असा ही प्रश्न विचारला जात आहे. सरकार कडूनही तिजोरीवर बोजा वाढून राज्य दिवाळखोरीत जाईल म्हणत जुनी पेन्शन देण्यास असमर्थता दर्शवली जात आहे. आंदोलक कर्मचारी आमदार, खासदारांना पेन्शन तर मग आम्हाला का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. कर्मचाऱ्यांचा पगार जास्त तर मग आमदारांचा पगार किती याची माहिती अधिकारातून मागून तो पत्र सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. तो पत्र १३ फेब्रुवारीचे असून संकेत नेवगी रा. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यांनी ही माहिती मागितली आहे. या पत्रावर महाराष्ट्र विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन व इतर सर्व मिळून एकत्रित रक्कम ची माहिती आहे. यामध्ये मुळ वेतन १ लाख ८२ हजार २००, महागाई भत्ता ३४ % ६९ हजार ९४८, दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार, स्टेशनरी व टपाल भत्ता १० हजार, संगणक चालक सेवा मिळवण्यासाठी १० हजार, एकूण २ लाख ७२ हजार १४८, व्यवसाय वजाती २००, स्टॅम्प वजाती १ रु. एकूण निव्वळ वेतन २ लाख ७१ हजार ९४७ इतकं आहे. मग आमदाराला इतका पगार का? असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा पेन्शन आहेच ना, या विरोधात अधिकाधिक जनहित याचिका दाखल करण्याची विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »