आमचं मत विकासाला म्हणजे आ.नमिता मुंदडा यांना; केजच्या मतदारांचा निर्धार
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : निवडणुकीची धामधूम सुरू असून, अनेक उमेदवार आपणच कसे लायक उमेदवार आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण काही मतदार असे आहेत की, मतदारच त्यांना योग्य उमेदवार असल्याची पसंती देत आहेत. त्यातील एक म्हणजे केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा या आहेत. यांच्या विकासकामामुळे आमचं मत विकासाला म्हणजे मुंदडा यांना म्हणत विजयी करण्याचा निर्धार केला.
राजटारणाचा दर्जा सध्या खूप खालावला असून, विकासाच्या मुद्यांना फाटा देत जातपात, धर्म, पंथ असे विविध मुद्दे काढून तोडा फोडा अन् राज्य करा हे धोरण राबविण्यात येत आहे. हा मुद्दा नाही चालला तर काहीही करुन बुद्धीभेद करायचे मनगटाच्या जोरावर अथवा पैशाचा वापर करुन लोक आपल्याकडे ओढून वर्चस्व कायम राखायचे हे राजकारण्यांचे धोरण दिसून येत आहे. पण अशा काळातही सामान्य माणसाशी बांधील राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असणारेही काही राजकारणी माणसं आहेत. त्यांच्यामुळे काही प्रमाणात विश्वास टिकून आहे. बीड जिल्ह्यातील मुंदडा कुटुंबाने सामान्य माणसाशी असलेली बांधिलकी ढळू दिली नाही. त्याचं प्रत्येक काम करायचं असं त्यांनी ठरवलं आहे यावर ते कायम आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, आमदार नमिता मुंदडा या नियमित कामासाठी तत्पर असतात. त्यांच्याकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परतला असे कधी ते घडू नये याची काळजी घेतात. मागील निवडणुकीत याच कामामुळे मतदारांनी विजयी करुन सेवेची संधी दिली होती. मातदारांचा विश्वास सार्थ ठरवित मागील पाच वर्षात अनेक कामं केली. या कामांची दखल सामान्य माणसाने घेतली आहे. ही दिसणारी विविध विकासकामे पाहाता केज विधानसभा मतदारसंघातील मतदार आमच मत विकासाला म्हणजे आ. नमिता मुंदडा यांना असा निर्धार केला आहे. यामुळे नमिता मुंदडा या किती मतांची आघाडी घेणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.