आपली छोटीशी मदत या तरुणाचे आयुष्य वाढवू शकते
केज : तालुक्यातील साळेगाव येथील अवघ्या २३ वर्षाच्या तरुणाला ह्रदय विकाराचा तिव्र झटका आल्याने त्यास तातडीने लातूर येथे उपचारासाठी हलविले परंतु तेथील डॉक्टरांनी पुणे येथे घेऊन जाण्यासाठी सांगितले, सध्या पुणे येथे रुबी हॉल मध्ये उपचार सुरू आहेत. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या तरुणाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आपली छोटीशी मदत याचे आयुष्य वाढवू शकते. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचं हात द्यावी अशी विनंती नातेवाईकांनी केली.
नामदेव उर्फ नामू संजय कळसकर ( वय २३ वर्ष ) असे या तरुणाचे नाव आहे. तो महावितरण कंपनी युसूफवडगाव कनिष्ठ अभियंता कार्यालय अंतर्गत कंत्राटी तंत्रज्ञ म्हणून काम करीत आहे.( दि. १४ ) फेब्रुवारी या तरूणाला हृदय विकाराच्या तीव्र झटका आला. तातडीने त्यास प्रथम लातूर व नंतर रुबी हॉल पुणे येथे उपचारासाठी हलविले आहे. नामदेवची प्रकृती अतिशय नाजुक आहे. त्यांच्यावर पुणे येथे शस्त्रक्रिया झाली असून उपचार सुरू आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. इतका खर्च करणं मुश्किल असून उपचारांसाठी लागणारी रक्कम खूप मोठी आहे. नामदेव सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या झुंजीला आपल्या ही मदतीची गरज असून, या मदतीमुळे तो नक्कीच पुन्हा आपल्या गावी व नातेवाईकांमध्ये परत येईल, त्यामुळे शक्य होईल त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आपली मदत करावी.
संपर्क :-
राहुल संजय कळसकर (नामदेवचे मोठे बंधू)
स्टेट बँक ऑफ इंडिया SBI
IFSC :- SBIN0011128
A/C No. :- 20371287854
फोन-पे :- 7721881009
गुगल-पे :-7721881009