राजकारण

‘आपलं गाव आपलं सरकार’ चा नारा देत केजमध्ये पाटील, इनामदार एकत्र

 

नगर पंचायतीमध्ये सत्ता कोणाची? चर्चेला पूर्णविराम

लोकगर्जना न्यूज

केज नगर पंचायतीच्या निवडणुकीत जनतेने कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्ता कोणाची येणार? अशी चर्चा रंगली होती. परंतु आज जनविकास आघाडीचे हारुन इनामदार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे आदित्य पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘आपलं गाव आपलं सरकार’ हा संकल्प घेऊन जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र काम करणार असून नगरपंचायतीत सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगून सत्ता कोणाची? या चर्चेवर पडदा पडला आहे. परंतु ज्यांना जनतेनं नाकारलं व स्विकारले तेच पुन्हा एकत्र आले. या समिकरण बाबतीत जनतेच्या काय प्रतिक्रिया येतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

केज नगरपंचायत निवडणुकीत हारुन इनामदार यांची जनविकास आघाडी ८, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय काँग्रेस ३ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे कोण एकत्र येणार? नगर पंचायतीमध्ये सत्ता कोणाची येणार? या बाबतीत शहरात निकाल लागल्या पासून जोरदार चर्चा सुरू होती. मंगळवारी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपाचा नगराध्यक्ष होणार? असे वक्तव्य केले. त्यामुळे शहरातील नागरिक अचंबित झाले. परंतु या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आज दुपारी शिवनेरी बंगल्यावर जनविकास आघाडी, काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे सांगत नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले. ही सत्ता पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक केला. गावा विषयी गाववाल्यांनाच कळवळा असतो, त्यामुळे आपलं गाव आपलं सरकार हा संकल्प घेऊन पाटील गावचे असल्याने खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो. केजच्या विकासासाठी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही नगरपंचायतीत एकत्र काम करुन केजला पुढे नेहण्याचा प्रयत्न करणार असे जनविकास आघाडीचे हारुन इनामदार म्हणाले तर आदित्य पाटील म्हणाले की, जनतेने त्रिशंकू कौल दिल्याने सत्ता स्थापनेसाठी कोणाला तरी सोबत घेणं आवश्यक आहे. त्यामुळे गावाच्या विकासाची हारुन इनामदार यांना तळमळ असल्याने आम्ही एकत्र आलो. पुढील पाच वर्ष आम्ही नगरपंचायत सभागृहात सोबत काम करणार असल्याचे म्हटले. यावेळी अंकुशराव इंगळे, पशुपतीनाथ दांगट, हाजीमौला सौदागर, विजयकुमार भन्साळी, दिलीप गुळभिले, शकिल इनामदार यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »