आनेगाव येथे बजरंग सोनवणे यांच्या हस्ते आरओ फिल्टरचा शुभारंभ

केज : तालुक्यातील आनेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आरओ प्लॅन्ट सुरू करण्यात आले. याचे आज रविवार येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांचा हस्ते करण्यात आले.
अशुध्द पाण्यामुळे अनेक साथीचे आजार बळावण्याची भीती असते, त्यामुळे गावकऱ्यांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतने निर्णय घेतला होता. आज गावात आरओ फिल्टर बसविण्यात आले. याचा शुभारंभ ही बजरंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी नागरगोजे, ग्रामसेवक बचुटे, सरपंच कविदास रामगुडे, उपसरपंच अप्पासाहेब हंडीबाग, चेअरमन शंकर इंगळे, धनेगावचे सरपंच सुहास गुजर, नायगावचे सरपंच विवेक खोडसे, बावची माजी सरपंच बाळासाहेब नांदे, योगेश हंडीबाग, रवी इंगळे, श्रीधर हंडीबाग, अमोल हंडीबाग, दीपक हंडीबाग, बालाजी इंगळे, पंकज खोडसे, दत्तप्रसाद नांदे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.