आत्ताच्या घडीचे दोन मोठे अपडेट!धनंजय मुंडे यांना फोन वरुन धमकी
लोकगर्जनान्यूज
बीड : छगन भुजबळ पाठोपाठ धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला. त्या व्यक्तीने ५० लाखांची मागणी केली आहे. यामुळे खळबळ माजली आहे.
नुकतेच राज्यात भूकंप करून अजित पवार हे भाजप, शिवसेना सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार गेले आहेत. त्यातील दोन छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या दोघांनाही धमकीचे फोन आले आहेत. छगन भुजबळ यांना फोन करून धमकी देणाऱ्याला पोलीसांनी कोल्हापूर येथून अटक केली. ही घटना ताजी असतानाच धनंजय मुंडे यांनाही अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली. ५० लाख रुपयांची मागणी केली. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली आहे.
———————–
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मार्ग मोकळा
राज्यातील मागील काही वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा घोडा आडलेला होता. याप्रकरणी दाखल याचीका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. यामुळे आता नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.