आडस येथे वृक्षारोपण; सर्वोदय प्रतिष्ठानचा उपक्रम
आडस : केज तालुक्यातील आडस येथे रविवारी ( दि. २४ ) सकाळी आडकेश्वर मंदिर परिसरात विविध प्रकारच्या १५० वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सर्वोदय सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार यांनी पुढाकार घेतला.
येथील सर्वोदय सेवा प्रतिष्ठान नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो, कोरोना काळातही अनेक गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी, आवश्यक औषधं वाटप, आरोग्य शिबिर असे उपक्रम सुरू असतात. यावर्षी प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी ( दि. २४ ) आडकेश्वर मंदिर परिसरात चिंच, बेल, लिंब, नांदुरा, करंजी, आपटा सह इत्यादी देसी १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. तर येणाऱ्या रविवारी ( दि. ३१ ) रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाही आडस परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमात वेळी सागर पवार, शिवरुद्र आकुसकर, किशोर माने, अनंत शेळके, सतिश आढाव, विष्णू आडसकर, संतोष चवार, सचिन पवार, पत्रकार रामदास साबळे यांच्या सह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.