आडस येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी
आडस : जानते राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त शनिवारी ( दि. १९ ) मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून साजरी करण्यात आली. शासकीय निमशासकीय कार्यालये,घरी, दुकानांमध्ये असे विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून आयोजित कार्यक्रमात युवा नेते ऋषिकेश आडसकर ( उपसभापती पं.स. केज ), भागवत नेटके ( जिल्हा परिषद सदस्य ), सरपंच बालासाहेब ढोले,मुख्याध्यापक अनंत शेळके, उद्योजक विठ्ठल माने, से.सो. चेअरमन उद्धवराव इंगोले, कृष्णा आडसकर, विकास काशिद ( शिवसेना तालुका उपप्रमुख ) यांच्यासह आदिंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यानंतर सर्वांना खिचडीचे वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवरूद्र आकुसकर, ओमकार शेळके, शाम गंगात्रे, प्रदीप इंगोले, नितीन वैष्णव, रतन कदम, विष्णू मायकर, गणेश गंगात्रे, चंद्रकांत शिंदे, इस्माईल शेख यांच्यासह आदिंनी परिश्रम घेतले. तसेच पांडुरंग शेंडगे यांच्या ही घरासमोर शिवजयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. लोककल्याण सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुषमा आकुसकर यांनी ही घरीच आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी मुलामुलींची छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा विविध वेशभूषा करून घरा पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत फेरी काढली. यासाठी त्यांना सविता आकुसकर, सौ. राही इंगोले यांनी सहकार्य केले.