आडस येथे रविवारी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन; गरजुंनी लाभ घ्यावा
आडस : केज तालुक्यातील आडस येथे रविवारी ( दि. ३१ ) महा रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध तज्ञ डॉक्टर रुग्णांचे निदान व उपचार करणार आहेत. या शिबिराचा परिसरातील गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आडस परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सर्वोदय सेवा प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महा रोगनिदान व उपचार शिबिराचे रविवारी ( दि. ३१ ) जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छाती विकार, अस्थिरोग ( हडांचे ), बालरोग, स्त्री रोग, ह्रदय, मधुमेह, रक्तदाब, दंत रोग, नेत्र रोग यांची तपासणी, निदान व उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. अनिल मस्के, डॉ. नामदेव जुने पाटील, डॉ. जुबेर शेख, डॉ.अविनाश मुंडे, डॉ. प्रगती मुंडे, डॉ. लक्ष्मीकांत पांचाळ, डॉ. कृष्णा केकाण, डॉ. आनंदसिंह पवार हे तज्ञ डॉक्टर निदान व उपचार करणार आहेत. या शिबिराचा आडस व परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक सागर पवार यांनी केले आहे. हे शिबीर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे. यासाठी कोणतीही नोंदणी अथवा फीस भरण्याची आवश्यकता नाही. ही पुर्णपणे मोफत शिबिर असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.