आडस येथे तरुणाची आत्महत्या
आडस : तीन दिवसांपासून गायब असलेल्या येथील एका तरुणाचे प्रेत आसरडोह रस्त्यावरील विहिरीत आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आले. त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
शेख निसार तुराब रा. आडस ता. केज असे मयत तरुणाचे नाव आहे. निसार हा शनिवार ( दि. २ ) पासून घरातून गायब होता. त्याचा कुटुंबातील व्यक्तींनी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. आज मंगळवारी ( दि. ५ ) दुपारी पाण्याचे खाजगी टँकर पाणी आणण्यासाठी रामदास विश्वनाथ ढोले यांच्या आसरडोह रस्त्यावरील शेतातील विहीरीवर गेले होते. त्यावेळी पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला. याची खबर धारुर पोलीसांना देताच एपीआय विजय आटोळे, एएसआय गोविंद बास्टे यांच्या सह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढलं असता तो शेख निसार तुराब याचा असल्याचे कुटुंबातील व्यक्तींनी ओळखले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तरुणाने आत्महत्या का केली हे कारन अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासात तो निष्पन्न होईल. या घटनेने आडसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.