भवताली
आडस येथे काही वेळात आडकेश्वर मंदिरावर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी!
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील ग्रामदैवत आडकेश्वर मंदिराचे जिर्णोद्धार करण्यात आले. काम पुर्ण झाल्याच्या आनंदात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. हे डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण पहाण्यासाठी जनतेने मोठी गर्दी केली.
आडस येथे अंबाजोगाई रस्त्यावर गावाचे ग्रामदैवत आडकेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा नुकताच ग्रामस्थांच्या सहकार्याने जिर्णोद्धार करण्यात आला. हे काम पूर्ण झाले असून, महानदीच्या काठावर देखणं असं मंदिर पुर्ण झाले. या आनंदात मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.