आडस येथील वैद्यनाथ अर्बन मल्टीपल निधी ( बँक ) चे मंगळवारी नव्या वास्तूत शुभारंभ
लोकगर्जनान्यूज
आडस : येथील वैद्यनाथ अर्बन मल्टीपल निधी ( बँक ) चा मंगळवारी ( दि. १५ ) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन वास्तूत स्थलांतर व शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी आडस व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तागड बंधु कडून करण्यात आले आहे.
आडस ( ता. केज ) येथील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या वैद्यनाथ अर्बन मल्टीपल निधी ( बँक ) च्या मुख्य शाखेचे धारुर रोडवरील बाजार समितीच्या कॉम्प्लेक्स मध्ये मंगळवारी ( दि. १५ ) सकाळी ११ वाजता स्थलांतर व शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपा नेते रमेश आडसकर, युवा नेते ऋषिकेश आडसकर, ही.भ.प. नंदिनीताई सानप, विष्णू घुले, उद्धवराव इंगोले, बालासाहेब ढोले, ओमकार आकुसकर, विठ्ठल माने, बाळासाहेब देशमुख, अनंत शेळके, बालासाहेब ढोले, हनुमंत कोकाटे, धनंजय चौधरी, दिपक ढगे यांच्यासह आदींची उपस्थिती रहाणार आहे. या कार्यक्रमाला आडस व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. पुरुषोत्तम तागड, विठ्ठल तागड यांनी केले आहे.