आडस महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ; अज्ञात व्यक्ती विरुद्ध एनसी दाखल

आडस : येथील महावितरण कंपनी कनिष्ठ अभियंता कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून आसरडोह उपकेंद्रात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यास मोबाईल क्रमांकावर फोन करुन शिवीगाळ झाल्याची घटना मंगळवारी ( दि. २० ) घडली आहे. या प्रकरणी एका अज्ञात आरोपीच्या विरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे.
बालासाहेब कारभारी तिडके ( वय ४७ वर्ष ) वरिष्ठ तंत्रज्ञ असे तक्रारदार कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी ( दि. २० ) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मी आसरडोह येथून आडसकडे येताना माझ्या मोबाईल क्रमांक ९६२३१६८४८७ यावर ८४५९६१६२९५ या अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने मला मोरफळी येथील वीजपुरवठा बंद का आहे? असे विचारले. आसरडोह उपकेंद्रात काही बिघाड असेल, चौकशी करुन वीजपुरवठा सुरू करण्यास सांगतो असे म्हटले. परंतु त्या व्यक्तीने तु खुप माजलास, तुझ्याकडे पहावं लागेल असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. या तक्रारी वरुन धारुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे.