आडस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गोविंद पाटील बिनविरोध
![आडस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गोविंद पाटील बिनविरोध आडस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गोविंद पाटील बिनविरोध](https://i0.wp.com/lokgarjananews.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231129-WA0014.jpg?resize=780%2C470&ssl=1)
लोकगर्जनान्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आडसकरांचे समर्थक गोविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केज तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दुसऱ्या टप्प्यात पार पडली यासाठी ( दि. ५ ) नोव्हेंबर मतदान घेण्यात आले. ६ तारखेला निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये आडसकर पॅनले सरपंचपदी सौ. योगेश्वरी देशमुख आडसकर यांच्यासहित १४ उमेदवार विजयी झाले. विरोधी पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. यानंतर उपसरपंचपदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते. मंगळवारी ( दि. २८ ) उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली. यावेळी आडसकर कुटुंबाचे समर्थक गोविंद पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. उपसरपंचपदी निवड होताच गोविंद पाटील यांचा शशी आडसकर, चेअरमन उद्धवराव इंगोले, ग्रामविकास अधिकारी अशोक तोडकर, शेख इसाक सह आदींनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. तसेच मित्र, नातेवाईक सह अनेकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.