क्राईम
आडस-अंबाजोगाई रस्त्यावर स्कॉर्पिओचा अपघात एक ठार
लोकगर्जनान्यूज
भरधाव वेगात येत असलेली स्कॉर्पिओ पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार जागीच ठार झाला. सदरील घटना काही वेळापूर्वी आडस-अंबाजोगाई रस्त्यावर उमराई शिवारात घडला आहे. लोखंडी सावरगाव येथे धडक देऊन पळून जाताना अपघात घडल्याची चर्चा आहे.
लोखंडी सावरगाव जवळ कोणालातरी धडक देऊन लोक पकडून मारतील म्हणून आडस मार्गे पळून जाण्यासाठी स्कॉर्पिओ क्रमांक MH 12 DE 4330 भरधाव वेगाने पळवत असताना केंद्रेवाडी व उमराई दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. दोन ते तीन पलट्या मारल्या यामध्ये स्कॉर्पिओ मधील एकजण जागीच ठार झाला. तर एकजण किरकोळ जखमी आहे. मयत हे अंदाजे 60 वर्षं असेल ते जवळबन ( ता. केज ) येथील असल्याची माहिती मिळाली असून नाव मात्र समजु शकले नाही. आडस चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.