आडस-अंबाजोगाई रस्त्यावर हरीण मृतावस्थेत आढळला
धारुर वण कार्यालयाच्या संवेदना बोथट झाल्या का?
अंबाजोगाई : अंबाजोगाई-आडस रस्त्यावर उमराई जवळ दुपारी प्रवाशांना हरीण मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती धारुर वण कार्यालयाला देण्यात आली. परंतु लक्ष्मण नरवडे नावाच्या कर्मचाऱ्याने अंबाजोगाई कार्यालय हद्दीतील घटना असल्याचे सांगून अंबाजोगाई कार्यालयाला माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे ज्या विभागात काम करतोय त्यांनाच माहीत न देण्याचे काय करण? की, धारुर वण कार्यालयाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उन्हाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात इकडे तिकडे धाव घेतात. त्यामुळे त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार उमराई ( ता. अंबाजोगाई ) जवळ मृतावस्थेत आढळून आलेल्या हरीण बाबतीत घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कदाचित पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. येथे हरीण मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती प्रथम धारुर वण कार्यालयाला फोन करुन दिली. परंतु नरवडे नावाच्या कर्मचाऱ्याने ती घटना अंबाजोगाई कार्यालय हद्दीतील असल्याचं सांगून माहिती देणाऱ्याला बोलने ही टाळलं. तसेच अंबाजोगाई येथील वनपालचा नंबर दिला पण त्या कार्यालयाला माहिती देणं टाळलं. ज्या विभागात सेवा करता त्यांनाही माहिती देण्याचे टाळले जाते मग सामान्य नागरिकांनी का माहित द्यावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच धारुर वण कार्यालयाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर अंबाजोगाई कार्यालयाला माहिती देताच त्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे.