आडसमध्ये जिओची तीन दिवसांपासून रेंज गायब;बँकेचा व्यवहारही ठप्प
आडस : केज तालुक्यातील आडस येथे तीन दिवसांपासून रेंज गायब झाली. यामुळे जिओच्या ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील एकमेव असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा व्यवहार ठप्प झाला असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
करलो दुनिया मुठ्ठी में म्हणत रिलायन्सने जिओ या नावाने मोबाईल सेवा सुरू केली. सुरवातीला मोफत सेवा दिल्याने अनेकांनी जिओ सिम कार्ड खरेदी केले आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून येथे जिओच्या नेटला स्पीड मिळतं नसल्याची ग्राहकांच्या तक्रारी आहेत. मागील तीन दिवसांपासून पुर्ण रेंज गेली आहे. तीन दिवस उलटले तरी सेवा सुरळीत झाली नाही. येथील एकमेव बँक असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँकही जिओचे नेट वापरत असून तीन दिवसांपासून रेंज गायब असल्याने व्यवहार ठप्प झाले. आदी शनिवार-रविवरची सुट्टी सोमवारीही बुद्ध पौर्णिमेमुळे सुट्टी असल्याने सलग तीन दिवस बँक बंद होती. यानंतर मंगळवार व बुधवार असे दोन दिवस नेट बंद असल्यामुळे असे सलग पाच दिवस व्यवहार ठप्प आहेत. लग्न सराईत बँक बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. बुधवारी ( दि. १८ ) सायंकाळी ५:३० पर्यंत रेंज आली नव्हती आज गुरुवारी सुरू होणार की, नाही.? असा प्रश्न विचारला जात आहे. रेंज नसल्याने हातातील खेळणे बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.