आडसच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आर ओ प्लँट Ro plant चा शुभारंभ
विद्यार्थ्यांना मिळणार शुध्द पाणी
लोकगर्जनान्यूज
आडस : येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी ( दि. २१ ) १०:३० सकाळी आर ओ प्लँट ( Ro plant ) चा शुभारंभ शशी आडसकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता शुध्द पाणी मिळणार असल्याने पालकांमधून शाळेचे आभार मानले जात आहे.
अनेक साथ रोगांचे कारण अशुद्ध पाणी असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी श्री.छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांनी येथील श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात मोठ्या क्षमतेचे आर ओ फिल्टर प्लँट ( Ro plant ) उपलब्ध करून दिले. तो कार्यान्वित करण्यात आला. याचा शुभारंभ शशी आडसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक भारत सोळंके होते तर चेअरमन उद्धवराव इंगोले, पत्रकार रामदास साबळे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब ढोले, नितीन ठाकूर सह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या वतीने यावेळी प्रमुख मान्यवर व पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकीशन आकुसकर, राजेश देशमुख, मिठु लाखे, भारत वाघमारे, प्रमोद बिडवई, दत्तात्रय अंबाड, गणेश इंगोले सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शिनगारे यांनी केले तर आभार शेख साजिद यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.