आपला जिल्हा

आडसकरांचा आगळावेगळा पायंडा: चौक तर प्रत्येक गावात पण हा चौक राज्यात पहिला…का होतेय चर्चा?

लोकगर्जनान्यूज

राज्यातील प्रत्येक गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आहेच. अनेक ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. याच जिल्ह्यातील आडस येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक नव्याने बांधण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे चौकाच्या चारही बाजूंनी आरबानी दगडात कोरुन राजमुद्रा बसविण्यात आली. राजमुद्रा असलेला राज्यातील हा चौक पहिला ठरला. हा आगळावेगळा पायंडा शिवप्रेमी युवक नेते ऋषिकेश आडसकर आणि तरुणांच्या संकल्पनेतून साकार झाला. या चौकाचा लोकार्पण सोहळा शिवजयंती दिनी ( दि. १९ ) सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येकाच्या स्मरणात रहावा जाताल तिथे आठवण रहावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चौकाची स्थापन करण्यात आलेली आहे. अनेक मोठ्या शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला. बीड शहरातही महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्या बाबतीत माजी कुलगुरू शिवाजीराव भोसले आपल्या व्याख्यानात राज्यातील सर्वात आकर्षक पुतळा असल्याचा उल्लेख केला आहे. याच बीड जिल्ह्यातील आडस ( ता. केज ) येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. नवीन बांधकाम करत असताना हा चौक राज्यात आदर्श ठरावं असा युवक नेते ऋषिकेश आडसकर यांचा मानस होता. यातून चर्चा करून शिवप्रेमी तरुणांच्या संकल्पनेतून चौकात राजमुद्रा बसविण्यात यावी असा विचार समोर आला. जगाच्या कल्याणासाठी राज्य आहे असा विश्वास शेतकरी, कष्टकरी, दुःखी, रंजल्या गांजलेल्या रयतेच्या मनात राजमुद्रेने निर्माण केला. याचा आपल्याला विसर पडणार नाही. यासाठी राजमुद्रा बसविण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. हा चौक प्रत्येक गावकऱ्याला माझं चौक वाटायला हवं म्हणून गावातून देणगी गोळा करून निर्मिती करण्याचा विचार झाला. यामध्ये युवक नेते ऋषिकेश आडसकर यांनी मोठं सहभाग घेतला. यानंतर अनंत शेळके ( गुरुजी ) ,बब्रुवान ढोले, गजानन देशमुख, सरपंच बालासाहेब ढोले, चंद्रकांत शिंदे, विष्णू मायकर हे नाममात्र नावं असून यामध्ये अनेक ग्रामस्थ व तरुणांनी झोकून देऊन काम केल्याने हा चौक उभा राहिला आहे. आडसकरांचा हा उपक्रम अनेकांना भावला असून चौकाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजमुद्रा असणार पहिला चौक आडसकरांनी उभा केल्याने कौतुक करण्यात येत आहे.


राजमुद्रा बनविण्यासाठी ‘आरबानी, दगड वापरून त्यावर कोरुन राजमुद्रा बनविण्यात आली.
वजन दोन टन वीस किलो असून चौकोनी ३९ इंच म्हणजे सव्वातीन फूट आहे. सदरील राजमुद्रा मुर्तीकार विशाल सर्जेराव भोसले रा. केर्ले ता. करवीर जि. कोल्हापूर यांनी बनविली आहे.
बांधकाम पठाण महेबुब ( आडस ता. केज ) यांनी तर मार्बल काम अशोक नंदकुमार गव्हाणे आणि गजानन धुमाळ ( चंदन सावरगाव ता. केज ) यांनी केले आहे. याचे डिझाईन आडसचे भूमिपुत्र इंजिनिअर पवनकुमार शिवानंद स्वामी यांनी केले. सध्या ते औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत.
आडसच्या वैभवात भर
देखणा व आगळावेगळा चौक आडसच्या वैभवात भर घालणारा ठरत आहे. गावाची व परिसराची शोभा वाढल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »