आजही बीड बायपास व गेवराई जवळ अपघात: तिघे जखमी

लोकगर्जना न्यूज
इनोव्हा कार व दुचाकीचा अपघात आज सकाळी बीड बायपासवर शिरोड जवळ घडला तर दुसरी घटना गेवराई शहराजवळ ट्रक व कारचा अपघात एका पेट्रोल पंप जवळ घडला आहे. दोन अपघातात तिघे जखमी असून, यात दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, धुळे – सोलापूर महामार्गावर शिदोड ( ता. बीड ) जवळ आज सोमवारी ( दि. २९ ) सकाळी एका अज्ञात नंबरच्या इनोव्हा कारने दुचाकी स्प्लेंडर एम.एच. १४ ए एल ८४६८ ला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार काळे चंदु ( भूम तालुक्यातील ) हा गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी प्रवास करणाऱ्या काहींनी मदत करत जखमीस बीड येथे रुग्णालयात दाखल केले आहे. धडक देणाऱ्या इनोव्हा कार चालकाने मदत करण्याऐवजी धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दुसरी घटना गेवराई शहराजवळ घडली आहे. बीड येथून गेवराई कडे जात असलेल्या कारला पाठी मागून ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये कार जागीच पलटी झाली. या घटनेत कार मधील दोघं जखमी झाले आहेत.