आईला रिक्षा वेळेवर मिळाला नाही…पट्याने असं काही केल की सर्वत्र होतेय वाह वाह
लोकगर्जनान्यूज
लातूर : आईला दवाखान्यात घेऊन जायचे होते. रिक्षा लवकर मिळाला नाही. रिक्षा मिळत नसल्याने जिवाची घालमेल सुरू झाली. पुन्हा आईला रिक्षाची वाटच पहाण्याची गरज पडू नये म्हणून इंजिनिअर मुलाने एक ॲपच बनवलं यामुळे आता शहरवासीयांना घरात बसून रिक्षा बोलावता येऊ लागली असल्याने सर्वांचीच सोय झाली यामुळे या इंजिनिअर मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दवाखान्यात जायचं असेल अथवा काही म्हत्वाचे काम असेल तर रिक्षा वेळेवर मिळेलच याची खात्री नाही. मग घर जर चौकापासून अथवा मुख्य रस्त्यापासून आत असेलतर त्यांना रस्त्यावर अथवा चौकात येऊनच रिक्षा पकडावी लागते. मग कधी कधी त्या पॉइंटवर रिक्षा उभी नसते मग ती येण्याची वाट पहात थांबावं लागतं. हे थांबणं महिलांना तर एकप्रकारे शिक्षाच म्हणावी लागेल. लातूर शहरात अशीच एक घटना घडली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या हरी व्यास यांच्या आईला दवाखान्यात जायचं होतं. अन् रिक्षा लवकर मिळत नव्हता. ही पहिली वेळ नव्हती तर अनेक वेळा खरेदीसाठी अथवा काही कामानिमित्त बाहेर जायचं म्हणजे आधी रिक्षाची वाट पहावी लागत असे. हा प्रकार हरी व्यास यांच्या लक्षात आला. यावर विचार सुरू करुन त्यांनी एक गो ॲटो ( Go auto ) नावाचा ॲपच बनवला यामुळे आता लातूरकरांना घरातूनच रिक्षा बोलावता येऊ लागली आहे. त्यामुळे लातूर करांची चांगली सोय झाली. यामुळे हरी व्यास यांचे कौतुक होत आहे.
सध्या फक्त लातूर शहरासाठी मर्यादित
गो ॲटो ( Go auto ) हे बनवलेल नवीन ॲप सध्या लातूर शहर पुरते मर्यादित आहे. फक्त याच शहरात रहाणारे नागरिक याचा लाभ घेऊ शकतात. हे ॲप एकदम चांगली सर्व्हिस देत असून, ओला,उबेरच्या तोडीचे असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या काळात आपल्याच मराठवाड्यातील या तरुणाचे ॲप सर्वत्र यावं अशी अपेक्षा आहे.