असाही पुणे पॅटर्न! तक्रार घेऊन आलेल्या पालकांना बाऊन्सर कडून मारहाण

शाळेच्या मुख्याध्यापकांनी बाऊन्सरला बोलावून मारण्यास सांगितले; पालकांचा आरोप!
लोकगर्जना न्यूज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शाळा बंद असताना ही फी वाढ केल्याने या बाबतीत विचारणा करण्यासाठी आलेल्या पालकांना महिला बाऊन्सर कडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नाराजी व्यक्त करत असाही पुणे पॅटर्न म्हणून लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
ही घटना बिबवेवाडी ( पुणे ) परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तरीही शाळेने फी मध्ये वाढ केली. या फी वाढी बाबतीत चौकशी करण्यासाठी अनेक पालक शाळेत आले होते. यावेळी पालक व शाळेच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊन्सरला बोलावून घेतले व आम्हाला मारहाण करण्यास सांगितले असा आरोप पालकांनी केला आहे. मंगेश गायकवाड असे मारहाण झालेल्या पालकाचे नाव असून त्यांनी शाळेच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलीसांनी एनसी दाखल केली आहे. याबाबतीत शाळेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.