अशी चुक तर तुम्ही करत नाही ना? दहाचं नाणं नाकारणाऱ्याला ग्राहक मंचचा दणका

लोकगर्जना न्यूज
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी १० रु. नाणं दुकानदार, ग्राहक कोणीच स्वीकारत नाही. परंतु ही चुक महाग पडू शकते हे उस्मानाबाद ग्राहक मंचच्या निकालावरून सिध्द झाले आहे. हे नाणं न स्वीकारणे एसटीच्या वाहकाच्या चांगलेच अंगलट आले आहे.
कोण अन् का? १० रु.नाणे बंद झाल्याची अफवा पसरवली. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी हे नाणं घेण्यास नकार दिला जातो. याला बीड जिल्हाही अपवाद नाही. हे नाणे चलनातून बाद झालेले नाही. असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. त्यामुळे नाणं घेण्यास नकार देणं कायद्याने गुन्हा आहे. परंतु याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. पण उस्मानाबाद येथे एक अशी घटना घडली की, याची मराठवाड्यात चर्चा होऊ लागली. त्याच झालं असं की, २२ मे २०१८ सायंकाळी साडेसात वाजता वैराग-उस्मानाबाद असा एसटी क्रमांक एम. एच. २० डी. ८१६९ प्रवास सय्यद अल्लावदिन बक्षु हे करताना एसटी चालक त्यांच्या जवळ आलं. अल्लावदीन यांनी टिकीट घेण्यासाठी एक १० व ५ चे नाणे दिले. वाहक बी.वाय.काकडे यांनी १० चे नाणं चालत नाही म्हणून घेण्यास नकार दिला. या विरोधात सय्यद अलावदीन यांनी ग्राहक मंच मध्ये तक्रार दाखल केली. याचा निकाल देत ग्राहक मंचाने त्या वाहकाला ८ हजारांचा दंड केला. ही रक्कम तक्रारदारास देण्याचे आदेश दिले. अशीच वेळ आता कोणावरही येऊ शकते. त्यामुळे १० रु. नाणं घेण्यास नकार देणाऱ्यांनी सावध होऊन ही चुक करु नये. अन्यथा असाच एखादा अल्लावदिन भेटला तर ८ हजार भरावे लागतील.