अवकाळीचा कहर दोन दिवसात वीज कोसळून अल्पवयीन मुलाचा मृत्यू तर आष्टी तालुक्यात दोन बैल दगावले
लोकगर्जनान्यूज
गेवराई : शेतात ऊसाला पाणी देताना वीज अंगावर कोसळून इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पाथरवाला बु. ( ता. गेवराई ) जवळ बनगर वस्ती शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच परवा आष्टी तालुक्यात दोन बैल दगावले आहेत.
श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे ( वय १६ वर्ष ) असे मयताचे नाव आहे. गेवराई सह जिल्हाभरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस होत आहे. शनिवारी रात्री श्रीराम ठोंबरे हा आपल्या शेतातील ऊसाला पाणी देत होता. यावेळी ९ च्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट झाला. श्रीरामच्या अंगावर वीज कोसळली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना शनिवारी ( दि. ३० ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली आहे. अवघ्या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.